उपक्रम
काही विशीष्ट उद्दिष्टे व ध्येय्य धोरणांच्या अनुषंगाने वर्षभर वेग़वेग़ळे सामाजिक उपक्रम राबविणॆ हे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट.
मंडळ राबबित असलेल्या उपक्रमांस सहाय्य करून आंपणही सामाजीक ऋण फेडू शकता.
- महिला विभागातर्फे शहरातील कर्तुत्ववान महिलांचा "सन्मानचिन्ह"देऊन गौरव.
- शारदीय संगीत महोत्सव: रसिकराज पुरस्कार
- 1994 श्री.बबनराव मांजरेकर
- 1996 श्री.एस.के.अभ्यंकर
- इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन 1994 पासून
- 1995 पासून किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात येतात.
- 1994 पासून वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.
- मंडळ वेळोवेळी वैद्यकीय शिबीरांचे आयोजन करित असते.
- दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंडळातर्फे नागरिकांना पेढे वाटून अभिष्टचिंतन केले जाते.
- कॉमेट सोसायटीच्या सौजन्याने मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
- रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करून रक्तगट सूची तयार करण्यात आली आहे.त्याचा उपयोग गरजूंना रक्तदाते उपलब्ध करून देण्याकरता होत आला आहे.