|
|
 |
स्वातंत्र्यपूर्व
काळात डोंबिवली हे एक छोटेसे खेडे होत.आल्हादायक
हवामान,शांत वातावरण झाडांची गर्दी व मुंबईला
जवळ ह्यामुळे 1948 पासून लोकवस्ती वाढू
लागली व गावाचे स्वरूप बदलू लागले.
स्वत:च्या
मालकीचे घर बांधण्यापेक्षा नोकरदार वर्ग
इथे चाळीमध्ये राहू लागला.एकदा रहायला लागल्यानंतर
त्या सर्वांनाच काही अडचणी कमी अधिक प्रमाणात
जाणवू लागल्या.
परंतु जागेचा गुण
किंवा स्थळमहात्म्य ह्यामुळे नवविवाहित
दुसरीकडे जाण्याचा विचारच विसरले व डोंबिवली
बहरू लागली.खेडेगावापासूनशहरापर्यंतच्या
स्थित्यंतरात गेल्या पन्नास वर्षात ह्या
गावात अनेक रत्ने झाली ज्यांनी डोंबिवलीचे
नाव उज्ज्वल केले.
|
| >> |
|
|
|
 |
खंडकर,पारखी,सोनटक्के,जपे,पंडित,वीरकर
यांनी लावलेले गणॆशोत्सवाचे रोप वाढून विस्तारले
आहे.टिळकनग़रातील बहुतांशी रहिवाशांचा मंडळाशी
संपर्क आहे व ही आपलेपणाची भावना एका पिढीकडून
दूसरीकडे हस्तांतरित झाल्याचे जाणवते. प्रथमपासून
भाद्रपदात दहा दिवसांसाठी साजरा होणारा
उत्सव खंडकरांच्या घरशेजारी सुरवातीला बसवला
गेला होता. मग तेथून सध्याच्या ओंकार सोसायटीच्या
मोकळ्या जागेवर ताडपत्रीच्या मांडवात साजरा
केला जाऊ लागला.
एक वर्ष परवानगी
न मिळाल्यामुळे सध्याच्या सुदर्शन सोसायटीच्या
मोकळ्या जागेत व तेथून लगेच श्री.पोंक्षे
यांच्या घराजवळील मैदानात स्थलांतरीत झाला.मोकळ्या
जागेवरील येणारी गंमत त्यानंतरच्या 11-12
वर्षात के.एन.कुलकर्णी व सुयोग मंगल कार्यालयात
अपेक्षित उंची गाठू शकली नसली तरी तेथील
काही फायदे काळाच्या ओघात जमेची बाजू ठरले.
|
| >> |
|
|
|
 |
काही विशीष्ट उद्दिष्टे
व ध्येय्य धोरणांच्या अनुषंगाने वर्षभर
वेग़वेग़ळे सामाजिक उपक्रम राबविणॆ हे टिळकनगर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट.
मंडळ राबबित असलेल्या उपक्रमांस सहाय्य
करून आंपणही सामाजीक ऋण फेडू शकता.
|
| >> |
|
|