किल्ले बांधणी स्पर्धा-- २०११

किल्ले बांधणी स्पर्धा-- २०११
 
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली ( पूर्व ) आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा २०११ चा निकाल टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत डोंबिवलीतील २८ किल्ले तयार केलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अगदी लहान मुलां पासून ते मोठ्यान पर्यंत सर्व प्रकारच्या ग्रुपचा या मध्ये अंतर्भाव होता. मंडळातर्फे ठाण्यातील गडप्रेमी श्री आदित्य बोरुडे यांना परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. मंडळातर्फे स्पर्धा आयोजनात हृषीकेश गायकवाड आणि तन्मय गोखले यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.
 
प्रथम क्रमांक : दौलताबादचा देवगिरी किल्ला , आनंद भुवन सोसायटी, शास्त्री हॉल जवळ, दत्तनगर, डोंबिवली पूर्व
द्वितीय क्रमांक : प्रतापगड, अरुण निवास , जुनी डोंबिवली , डोंबिवली पश्चिम
तृतीय क्रमांक : सिंधुदुर्ग , गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक : सिंहगड, संघवी गार्डन, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक : कुलाबा, अलिबागचा किल्ला , अस्मिता सोसायटी, एम्स हॉस्पिटल समोर,
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक : सरस गड , दैवज्ञ कॉलनी, डोंबिवली पूर्व.